SCHOOL WEBSITE
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सरल मध्ये स्टाफ,स्टूडंट आणि स्कूल पोर्टल मध्ये भरलेल्या माहिती चा उपयोग करुन प्रत्येक शाळेसाठी एक वेबसाइट तयार करण्यात आलेली आहे.या वेबसाइट वर आपण आपल्या शाळेची माहिती तपासून पाहू शकता.सदर वेबसाइट ही सर्वांसाठी (शिक्षक,विद्यार्थी,पालक,समाज) उपलब्ध असणार आहे.त्यामुळे सदर वेबसाइट मध्ये आपण पोर्टल ला भरलेली माहिती योग्य प्रकार दिसत आहे का हे सर्वानी तपासुन पहाणे गरजेचे आहे.सदर वेबसाइट मध्ये आपण विद्यार्थयाना नोटिस देणे,पालकासाठी सूचना,शाळेसंबधी विविध कार्यक्रमाचे आयोजन नियोजन,विविध फ़ोटो अपलोड करणे,शाळेचा निकाल प्रदर्शित करणे,सर्व पालकांना सामुहीक sms करणे,शाळा व्यवस्थापन समिती बैठक वृतांत,स्टाफ फ़ोटो प्रदर्शित करणे,शाळेला असलेली सुट्टी अथवा कार्यक्रम याबाबत वेबसाइट वर सूचना देणे आणि शाळेच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देणे अशा अनेक प्रकारच्या विविध बाबी नव्याने वेबसाइट मध्ये भरू शकाल.सरल मध्ये केलेल्या कामाचा उपयोग करुन समाजा पर्यंत शाळा आता एका क्लीक वर पोहचनार आहे.त्यामुळे आपल्या शाळेची वेबसाइट आकर्षक कशा प्रकार होईल याची मुख्याध्यापकाने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.आपल्या शाळेची वेबसाइट पाहण्यासाठी खालील माहितीचा उपयोग करावा.




No comments:
Post a Comment